हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३ जुलै, २०१२

माझी मराठी

माझी मराठी

परदेशात माझिया
आता दिसे माझा देश
माझ्या मायेच्या भूमीत
मात्र वसे परदेश

परदेशात वसती
किती मराठी मंडळे !
मराठीच्या माहेरात
मात्र इंग्रजी आढळे !

आता सहानुभूतीची
माझ्या देशात "सिम्पथी"
अध्यात्म व सत्संगाला
आता "ट्रान्सलेटेड" पोथी

मी "बिलीव्ह" करतो
जेव्हा बसतो विश्वास
आणि असे "लाँग जर्नी"
माझा लांबचा प्रवास

My apologies देवा
चुकलं माकलं माफ कर
Please do something soooon...
माझी मराठी साफ कर !

- निलेश पंडित
२८ ऑक्टोबर २०१०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा