सुखयात्रा
मनासारखे झाले बाई मनासारखे झाले
सुवर्णक्षण येता स्वप्नी मम मन आनंदे न्हाले
वंचनेत या युगे लोटली स्मृतिही बधीर झाली
असह्य दुःखे सदा कपाळी, कुणी न आम्हा वाली
धन संपत्ती भरून वाहे, वाहति अश्रुहि नेत्री
सधनतेतही उपेक्षितान्च्या रुजति वेदना गात्री
आज अचानक कोणी सहृदय नसुनहि अमुच्या मधला
माथा टेकुनि पाया वरती मुलीस वरता झाला
पिढ्या पिढ्यांचे पाश तुटूनी जिवना गोडी आली
आम्हा किरवंतांची मुलगी सुखयात्रेस निघाली
- निलेश पंडित
२४ मे २०१२

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा