अहम ब्रह्मास्मि
माणूस माझ्यात जागा झाला
आणि म्हणाला देवाला
दे तुझ्या अस्तित्वाचा
तर्काधिष्ठित हवाला
फारच पूर्वी फ्रेड्रिक नित्शे
सांगुन गेला, "You are dead "
भित्या मनाला बरे वाटण्या
आम्हा मानवां लागे वेड
केशवसुतही सांगुन गेले
देवदानवा नरे निर्मिले
चार्वाकांचे ही मत पडले
देव कल्पनां मधून घडले!
देव म्हणाला हसून मजला
सुगुण समुच्चय तुझ्यातला मी!
याहुनि माझ्या अस्तित्वाची
दुसरी देऊ काय मी हमी?
- निलेश पंडित
जुलै २००७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा