(वृत्त: शार्दूल विक्रीडित)
तेजस्वी विदुषी उदंड प्रतिभा ख्याती तिची हो अशी
विद्वत्तेत हि नम्रता फुलतसे ऐसी छबी काहिशी
स्वैपाकातहि लोक... "सुग्रण किती"... वाखाणिती नेहमी
साधा, सामिष वा प्रकार परका...स्वादिष्टतेची हमी
नृत्त्याची लय पाहताच रसिका वाटे....कुणी षोडशी -
- खेळे, मोहक घालुनी अभुषणे रंभाच वा उर्वशी
आलापी, ठुमरी तसेच भजने माधुर्य साठा जसा
एकेका गुणसंचयात दिसतो विद्युल्लतेचा वसा
कष्टासाठि कुठेहि काहि अडता घामेजण्या ही पुढे
चारित्र्यात हि चोख...स्वच्छ प्रतिमा - दुष्कीर्तिचे वावडे
रूपा..रेखिव सुंदरी...महिवरी...आली जणू देवता
अस्तित्वातच तोषवीत सकलां...भ्राता, पती वा पिता
.....
कोणी सद्गुणि स्त्री अशीच दिसता जाई हिचा तोल का?
ऐसा काहि विकार दाह करतो...तो कोणता नेमका?
- निलेश पंडित
२९ जून २०१२

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा