आम्ही महाविद्यालयी
खूप..खूपच शिकलो
पदव्या आल्या पदरी
जरी विद्येला मुकलो
आमचा वर्ण अव्वळ
गोरी गोमटी ती विद्या
सुहास गोरे वरला
आहे "गोरे बाई" सध्या !
भौतिक शास्त्र म्हटलं
की भरून येतो ऊर
उरामध्ये त्या तासाला
भरत जायचो धूर !
रात्र रात्र जागून तो
ऐन वेळचा अभ्यास
हुशारांच्या मदतीनं
पास होण्याचा हव्यास !
झोपेतही छळतसे
आमचा पुढील -हास
आपला वाटे त्यामुळे
तो "ओल्ड मंक" चा ग्लास !
नाही म्हणायला एक
योग्य पायरी चढलो
उशीर होण्या आधीच
हिच्या प्रेमात पडलो !
- निलेश पंडित
२१ ऑगस्ट २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा