चिरंतनाच्या ध्यासापोटी
टणक सुपारी आयुष्याची
कुणी उगाळी डोळे झाकुन
सहाण घेउन मर्त्यपणाची
क्षणोक्षणी एकाच क्षणाचे
कुणी म्हणे आयुष्य जगावे
नशा करावी चिंता विसरत
भूत भविष्या अन् त्यागावे
या दोहोंना अभ्यासत मग
नित्य भरावी खळगी कोणी
ओसरीतल्या श्रीमंतांस्तव
ताक घुसळुनी काढत लोणी
श्रीमंतांच्या दारावरती
अखेर सारे उभे राहती
बुद्धी..भक्तीच्या दाव्यांनी
भीक मागुनी वाट पाहती !
- निलेश पंडित
२९ ऑगस्ट २०१२
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा