हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१२

आश्वासक


आश्वासक होऊन हेच बडबडले होते
मदत मागण्या गेलो तर अवघडले होते

"गैरसोय पैशाची थोडी असते सध्या"
ऐकवताना हे सोन्याने मढले होते

"इश्क प्रेम हे खोटे" मजला सांगत त्यांच्या...
मधुचंद्राच्या स्वप्नांमध्ये गढले होते

पुसत कोरड्या डोळ्यांमधले खोटे अश्रू
मागे हसुनी समोर माझ्या रडले होते

का वरला तू गरीब भोळा 'पंडित' साधा?
इथेच त्यांचे घोडे सारे अडले होते!

- निलेश पंडित
१६ ऑगस्ट २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा