माझ्या त्या सा-या कविता, या इथेच जन्मा आल्या
काही फसल्या अन् विरल्या, उरल्या रुजल्या स्थिर झाल्या
मित्रांनो माझी प्रतिभा, का फक्त म्हणावी माझी?
तुमच्याच मनांना भिजवित, मी तिला राखतो ताजी !
मग तुमच्या माझ्या मध्ये, अंधाराच्या का भिंती?
वावरतो प्रकाश भिउनी, भवती सारे अवघडती !
दृढ समाजमन शोधाया, अन् शुचिता ती मिळवाया
केवढी तपे मी शिणलो...गेली ती सारी वाया?
चुकले माझेही थोडे, झुकविला कधी ना माथा
त्यागात वसविली नकळत, अन् माझी मीच अहंता
मिटतो माझे मन आता, भरल्या डोळी मी जाता
चरणांत वाहतो तुमच्या...माझ्या त्या सा-या कविता
- निलेश पंडित
२० ऑगस्ट २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा