हा ब्लॉग शोधा

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१२

ओळख

स्वच्छ प्रकाशी सूर्य झळकले, तेजस्वी आले गेले
जगण्यासाठी ओतत गेलो, आम्ही घामाचे पेले

कायम वाचत बसलो गीता, अथवा तुकयाच्या ओव्या
युद्ध पेटले अन्नासाठी...हासडल्या मग मुक्त शिव्या

मर्ढेकर म्हणतात तसा तो "गणपत वाणी" मी झालो
केस पिकवले...सुरकुतलो अन् विद्रुपता संतत ल्यालो

थोपटता परि मला, पिलाला स्पर्श तुझा तारक झाला
संसाराच्या हरेक पदरी पूर्णत्वाचा क्षण आला

प्रकाश रात्री पुनवेच्याही, एक चांदणी लुकलुकली
मजला माझी ओळख पटली, अवघी सृष्टी झगमगली

- निलेश पंडित
८ ऑगस्ट २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा