गेले कधी तेजाळुनी जे शांत ता-यांसारखे
मागती ते मते आम्हा आता भिका-यांसारखे
पाहिले मी साप...त्यांचे दात होते काढलेले
लोकहो म्हणता कशाला त्यांना पुढा-यांसारखे?
गोड भाषा, स्वच्छ कपडे...वागण्याला नम्र मूर्ती
लावती ते तात पण नरड्याला शिका-यांसारखे
खाउनी ते पुष्ट असती, कमवुनी संतुष्ट ना पण
मन बघाया जाल तर दिसते आजा-यांसारखे
प्रश्न पडतो मरत नाही देश दंशाने कसा हा?
...मित्रहो जगतो असे हे आपण उता-यांसारखे !
- निलेश पंडित
९ ऑगस्ट २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा