काळजी घ्या
 
 कोणी पाजली हत्तीला?
 बघा सुटला मोकाट
 ज्याच्या त्याच्या मार्गावर
 करी विध्वंस अचाट
 
 अंगावर प्रत्येकाच्या
 धावे परजून सुळे  
दर्प दारूचा सर्वांगा 
तोंडातून दारू गळे
  वर्षे वर्षे चालून जी
 तुम्ही केली पायवाट
 तीच तुडवीत म्हणे
 "हीच होती माझी वाट"
 
 ग्रासतात असे हत्ती
 पृथ्वी-आकाशा-पाताळा
 सावध व्हा सज्जन हो
 वाटा आपल्या सांभाळा
 
 - निलेश पंडित
 १२ सप्टेंबर २०१२
 
 
 
 
          
      
 
  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा