हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २० सप्टेंबर, २०१२

एकाकी


माझा देश
माझे लोक
माझी जमीन
माझी भाषा
डोक्यात जाळि
विणत सुटतात
माझी खंत
माझ्या आशा

सा-यांवर या
डुलतात नामी
माझी मूल्यं
माझी नीती
चालत राहतो
पुढे पुढे मी
बदलत जाती
माझी नाती

नीती खाली
नात्यांखाली
सा-या माझ्या
"माझ्या" खाली
माझ्यासाठी
माझी प्रीती
एकाकीपण
माझी भीती

- १५ सप्टेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा