हा ब्लॉग शोधा

बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१२

पर्यायहीन


दिसतात मार्ग माझे पर्यायहीन सारे
येथेच वाहती पण, मृद्गंध युक्त वारे

घामेजल्या त्वचेला सुखवीत वाहती ते
माझे निसर्गतेशी जडवीत गूढ नाते

घोंगावती कधी अन् होती भयाण केव्हा
कधि लुप्त होउनी मग छळतात स्वस्थ जीवा

मग वर्षवीत मेघां, करती निसर्ग हिरवा
वाटे अशाच वेळी....लाभेल का विसावा?

ते हट्ट सोडले मी...पर्याय शोधण्याचे
वारे भरून घेतो, छातीत चालण्याचे!

- निलेश पंडित
२९ सप्टेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा