असते खरेंच सोपे रस्ते
 शेकडो गाळतात घाम जेथे
 असते तर केले हात उंच
 असून आम्ही खुजे अन...थिटे...
 ......आणि धरला असता सूर्य
 एखाद्या पुराण पुरुषा सारखा
 काढला असता मार्ग सुखाचा
 special - नेमका आणि बेरका
 म्हटले असते श्लोकही काही
 केले असते रुद्र नि यज्ञ
 हळद, कुंकू, फुले वाहुनी
 झालो असतोही सर्वज्ञ
 केलेही हे...सर्वही...आणिक
 अखेर शिकलो एकच सत्य
 आयुष्याचे कोष्टक भरण्या
 गाळित जावा घामच नित्य
 जोडीला ठेवावे अश्रू
 क्वचितच रक्ताची हि तयारी
 यांच क्षणांतुन सौख्य लुटावे
 चाखित जावी लज्जत न्यारी
 
 नसतात...नसतात सोपे रस्ते
 फुलते छाती...फुलतो श्वास
 श्रमा दमाने कष्ट सोसुनी
 भूक शमविण्या मिळती घास
 
 - निलेश पंडित
 ३० एप्रिल २०१२
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा