हा ब्लॉग शोधा

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२

बाप रे....वेदना !!


आज माझ्या वेदनेला रंगण्याचा योग आला
बायको नसता घरी हे सांगण्याचा योग आला !

काय सांगू लपविण्याची वेदना असते कशी ते?
चोरुनी थोडी पिताना...लाटण्याचा योग आला !

सांडली स्वैपाक करता कणिक मी थोडीच जेव्हा
अखिल वास्तू वाकुनी मी झाडण्याचा योग आला !

"जा जरा माहेरवासा...", मी हिला थोडे विनवता
"उकिरडा होतो घराचा...", ऐकण्याचा योग आला !

यौवना शेजारची येऊन मजला "हाय" म्हणता
बायकोची दिव्य दृष्टी झेलण्याचा योग आला !

एकटे पाहून सारे...जागते आशा मनी ही
आज थोडी एकमेकां पाजण्याचा योग आला !

- निलेश पंडित
२४ ऑक्टोबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा