हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१२

लढा


लिहिणारे लिहितात
बोलणारे बोलतात
आयुष्यभर
स्वतः जळणारे...
...जळतात...

फाटलेल्या झोळ्यांतून
भरले धान्य सांडते
नैसर्गिक निद्रेतही
व्यथा छळ मांडते
स्वच्छ पाण्यावरही
अदृश्य तवंग
संस्कारित मनालाही
गरळाचा कुसंग

या सर्वांमधूनही
काही मने हलतात
अदृश्य पावित्र्याला
ठाम साद घालतात

काळ घेतो...
काही बळी...
उरली मने फुलतात
भेगाळलेल्या बोटांनी
दो-यात फुले माळतात

...म्हणून काही लिहितात
बोलणारे बोलतात
आयुष्यभर स्वतः
....जळणारे जळतात

- निलेश पंडित
२ जून २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा