हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१२

लोण्याचा गोळा


बेकारीच्या करुण छटा अन्
खुरटी दाढी पांढुरलेली
दंगलवादी काळजा तही
मौज वासना कातर काळी

हसुनी जिंके दुडुदुडु धावे
बाळ चिमुकले गोजिरवाणे
आक्रस्ताळुनि रडेही कधी
मुके कधी हो केविलवाणे

सधनतेतही लुळी पांगळी
वृद्धावस्था व्याकुळ करते
कधी उडे रागाचा भडका
वात्सल्या कधि येई भरते

या सा-यांचा लसावि एकच
मऊ सूत लोण्याचा गोळा
कधी नाचतो भयाण तांडव
मात्र एरवी शंकर भोळा

- निलेश पंडित
२२ जुलै २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा