हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२

दोघे


एका घरात दोघे जण
एक वृद्ध आणि वृद्धा
तासन् तास शांतता
सुसंवाद तरीसुद्धा...
आजोबा खोकतात
आजी वळतात
"काय झालं...!" बघण्यासाठी
सुरकुतल्या कपाळी
दिसते चिंतेची
एक आठी
आजोबांच्या जेवणाचं
आजींनाच जास्त भान
जणू कोणी मूल लहान
आणि त्याची
भूक तहान

निःशब्द शांततेत
निर्व्याज व्यापार
अस्तिस्त्वाच्या बदल्यात
ऊब...माया...अपार

वार्धक्याच्या वाळवंटी
नाती अशी सजतात
पाहता पाहता डोळ्यांच्या
कडा आपसुक भिजतात

- निलेश पंडित
६ मार्च २००८

४ टिप्पण्या:

  1. असे मी प्रत्यक्ष पाहिले आहे आमच्या शेजारी.
    आजोबांचा वॉकर बंद होऊन चालणे फिरणे बंद झालेले आजींना शुगर. दोघेही ८०च्या घरात.
    आजी आजोबांची सोबत कायम होती.
    आजोबा आधी गेले. आजी नंतर.
    १० मिनिटांचा विरह.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वा...खरंच नशीबवान जोडपं म्हणायचं. शार्दूल...दर्दी आहेस. योगायोग किंवा आपल्या मनातल्या प्रेरणा एकमेकींच्यात गुंफलेल्या असतात त्याचा परिणाम म्हण ...काहीशी तू म्हणालास त्या प्रेरणेतून निर्माण झालेली एक कविता आठवली...जमेल तेव्हा वाच...

      http://nileshpanditpoems.blogspot.co.nz/2012/08/blog-post_16.html

      Thanks a million. :-)

      हटवा
    2. वाचतो. तुमचा ब्लॉग म्हणजे अलीबाबाची गुहा आहे.
      वाचणं केव्हा आणि कसं थांबवावं हेच कळत नाही..

      हटवा