हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२

योग - वियोग



"योग हे नि योग ते" म्हणायचे किती !
तू तिथे नि मी इथे झुरायचे किती !

पाहतो सभोवती बदल घडे सदा
तेच स्वप्न रोज मी बघायचे किती !

पात्र वेगळे जरी तरी नशा नसे
पेय तेच ते पुन्हा गिळायचे किती !

सूर दे तुझा जरा नि गोडवा हि दे
प्रणय गीत फक्त मीच गायचे किती !

एकदा मिठीत ये सखे विरून जा
सांग एकटेच मी निजायचे किती !

- निलेश पंडित
७ नोव्हेंबर २०१२

२ टिप्पण्या: