हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२

गाथा


चालावे विज्ञानाचे बंड अखंड
जरि इतिहासाचे माजे स्तोम प्रचंड
प्रत्येक युगाचे अंतिम क्षण येतील
हिरव्याची पिवळी पानेही होतील

ती रुढी सतीची बंदच झाली अंती
अन् गेले मांत्रिक...गेल्या मंत्र विभूती
प्रगती-उत्क्रांती एकच अनुभव स्पष्ट
मानवी श्रमांची गाथा अत्युत्कृष्ट

हे तर्क, निरीक्षण, प्रत्यय अन् अनुमान
मानवास करती सुसज्ज आणि सुजाण
यांतून जगाचे अमर मंत्र सुचतील
हिरवाई पुढच्या पिढ्या पुढे नेतील

- निलेश पंडित
२८ नोव्हेंबर २०१२

२ टिप्पण्या:

  1. निलेश, या कवितेत तुझी science वरची प्रगाढ निष्ठा दिसून येते आणि प्रगती चा आलेख असल्यामुळे आशा वाद पण दिसतो

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आभारी आहे संजय. हा केवळ एक दृष्टीकोण आहे अर्थात. माझ्या काही कविता श्रद्धेचा पुरस्कार करणाऱ्या ही आहेत - पण कमी.

      हटवा