हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ६ डिसेंबर, २०१२

"पंडिता" त्वरा करा !!


पडेल का हवे तसेच दान एकदा तरी?
सखे दया करून सोड मान एकदा तरी !

शिव्या नि शाप घाल मात्र बंधने नकोत गं
...दे जरा भरून ग्लास छान एकदा तरी !

जुगार एक खेळ फक्त! व्होडका ही वारुणी !
भरू कुणा नकोस देउ कान एकदा तरी !

पतीस लाटणे फुकाच मारणे बरे नव्हे...
उगा नकोच पेटवूस रान एकदा तरी !

भले कशात ओळखा नि 'पंडिता' त्वरा करा...
पळाच पाय लावुनी...तुफान एकदा तरी !

- निलेश पंडित
६ डिसेंबर २०१२

२ टिप्पण्या: