हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १ मार्च, २०१३

नतमस्तक


कर्जे एकामागे एक
काढतो मी हव्यासाने
स्पर्धकाच्या पुढे जावे
एकमेव या ध्यासाने

शिक्षणाचा, संपत्तीचा,
भोगाचा नि वैराग्याचा
उभा करतो देखावा
कर्तृत्वाचा नि भाग्याचा

नसलेले भासविण्या
व्यर्थ माझा खटाटोप
"लोक काय म्हणतील?"
यात उडे माझी झोप

असामान्य होण्यासाठी
अहोरात्र मी खपतो
धसताना क्षणोक्षणी
फक्त प्रतिमा जपतो

जीर्ण होतील ही वस्त्रे
वारंवार मी लेऊन
मिळेन अखेर तुला
नतमस्तक होऊन

- निलेश पंडित
१ मार्च २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा