हा ब्लॉग शोधा

शनिवार, ९ मार्च, २०१३

रस्ता


का संपत नाहित कधीच वेडे ध्यास...
भोवती रचुनही यत्नांची आरास?
उत्तराविना प्रश्नांची का सरबत्ती...
आकाशी बघुनी चिवडत जाता माती?

तांबड्या नभाला रात्रीचा का मोह?
आक्रोश नेहमी झाके का विद्रोह?
का धूळ थोडकी खराब करते पाणी?
बेसूरच अंती का होती ही गाणी?

आयुष्य कधीही एकसंध का नसते?
ऊर्जेच्या पोटी मरगळ का फसफसते?
धावतो, थांबतो आणि संपतो जो तो...
टप्प्या टप्प्यांचा रस्ता विचित्र असतो !

मी करीत बसतो तुकडे सारे गोळा
त्यामधेच असतो स्वप्नांचा पाचोळा
बांधतो एक गाठोडे त्या सा -याचे
पाहतो स्वप्न अन पुन्हा नव्या ता-याचे

ते स्वप्नच आता होते माझे जगणे
भर रात्री ता-यासाठी मग तगमगणे
पोहता विसरणे गढूळ सारे पाणी
चुकतात सूर पण गात राहणे गाणी !


- निलेश पंडित
९ मार्च २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा