हा ब्लॉग शोधा

बुधवार, ३ एप्रिल, २०१३

प्याला

(वृत्त: भूपती)

बघ...अनेक रंगी मोहांचा जग मेळा
शिरला जो जो तो मुरला पण ना उरला
का उगा स्वप्न तू पाहसि अमरत्वाचे?
नियतीने प्याला तुजसाठी मंतरला

ही माळ एक अन मणी त्यात कित्येक
वैराग्या खाली ठसठसतो अतिरेक
तू मार्ग बांध करण्याला निचरा त्याचा
कर मृत्यूवरती जगण्याचा उद्रेक

तुज पस्ताव्याचे नुरेल कारण काही
लाभतील तुजला दिशा मोकळ्या दाही
जगणे चालावे वा संपावे अवचित
सुटलेला क्षण पण फिरून येणे नाही !

- निलेश पंडित
२० मार्च २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा