हा ब्लॉग शोधा

रविवार, १४ एप्रिल, २०१३

वाहन

(वृत्त: समुदितमदना)
पृथ्वी सूर्या भवती फिरता गुंग होतसे मती
गिरक्या घेता नशेसवे नेहमी येतसे गती

गतीस मिळुनी असंख्य रूपे...आकर्षक भासते
देवत्वातहि वाहन प्रत्येकास मिळे खास ते !

कुणास लाभे मूषक कोणा सप्ताश्वांचा रथ
गरुडा वरुनी काही क्रमती अवकाशाचे पथ

क्वचित कुठे गायीच्या पाठीवर बसतो कावळा
वेग सोडुनी विश्रांतीचा नाद जरा आगळा !

पण मानव या सर्वांमध्ये अपवादात्मक जरा
नियंत्रणाची धडपड आणिक विचित्र त्याच्या तऱ्हा

स्वजातियाच्या पाठीवरती चाबुक घेउन बसे
विचार करतो, "वेग वाढण्या मारावे या कसे?"

- निलेश पंडित
६ एप्रिल २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा