(वृत्त: अनलज्वाला)
अज्ञानाचा भार वाहती अनेक प्राणी
नव्या युगीही गात राहती जुनीच गाणी
पाश्चात्त्यांना सुद्धा त्यांची चूक उमगली
अम्हा वाटती परंतु प्यारी तीच घराणी
समता आणिक सहिष्णुता ही तत्वे - मग का -
मुंग्या साखर करती गोळा … खाई राणी ?
भर दुष्काळी विहिरीसाठी कर्ज काढता
इथे तोंडचे शेतकऱ्याच्या पळते पाणी !
दारिद्र्याच्या रेषेखाली वाढे संख्या
देश मिरवतो नवनवीन पैशाच्या खाणी !
अन्न, वस्त्र इत्यादी गरजा नंतर पाहू
आधी जपुया परंपरा - संस्कृती पुराणी
न्यायदेवतेच्या डोळ्यांवर आहे पट्टी
तोवर चिरडा गोरगरीबांची गाऱ्हाणी !
- निलेश पंडित
१६ एप्रिल २०१३
अज्ञानाचा भार वाहती अनेक प्राणी
नव्या युगीही गात राहती जुनीच गाणी
पाश्चात्त्यांना सुद्धा त्यांची चूक उमगली
अम्हा वाटती परंतु प्यारी तीच घराणी
समता आणिक सहिष्णुता ही तत्वे - मग का -
मुंग्या साखर करती गोळा … खाई राणी ?
भर दुष्काळी विहिरीसाठी कर्ज काढता
इथे तोंडचे शेतकऱ्याच्या पळते पाणी !
दारिद्र्याच्या रेषेखाली वाढे संख्या
देश मिरवतो नवनवीन पैशाच्या खाणी !
अन्न, वस्त्र इत्यादी गरजा नंतर पाहू
आधी जपुया परंपरा - संस्कृती पुराणी
न्यायदेवतेच्या डोळ्यांवर आहे पट्टी
तोवर चिरडा गोरगरीबांची गाऱ्हाणी !
- निलेश पंडित
१६ एप्रिल २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा