हा ब्लॉग शोधा

रविवार, २८ एप्रिल, २०१३

तो

(वृत्त: मंदाकिनी)

येईल तो तेव्हा जरा माझ्या उशाशी थांब तू
जाईन मी नभसागरी … उरशील आणिक लांब तू

दाही दिशा खुलतील अन ग्रासेल तो मज ज्या क्षणी
तेव्हा मनी धर एक तारा … हीच माझी चांदणी

सारे तुझे गुज सांग ह्याला बोलका हा ही असे
मौनात याच्या खोलवर मिळतील भूताचे ठसे

शक्तीत 'त्या'च्या नांदते संहारकाची प्रेरणा
'ह्या'च्या उबेतुन लाभते मृत्युंजयाची धारणा

वसवू सुखाने मानसी ऊर्जा जरा सूर्यातली
रात्रीतही सुखवेल तुजला चांदण्यातिल सावली ....

-------------------------------------------------

येईल तो तेव्हा जरा माझ्या उशाशी थांब तू
जाईन मी नभसागरी … जाशील आणिक लांब तू


- निलेश पंडित
२८ एप्रिल २०१३

२ टिप्पण्या: