हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १७ मे, २०१३

व्रत

(वृत्त: कलिंदनंदिनी)

तळया मधील चंद्र आज ही मला सुखावतो
जुनेच स्वप्न … तेच ते पहात मी जडावतो

गुलाब, मोगरा, जुई बरेच ताटवे इथे
परी तुझ्या बटांमधील केवडा खुणावतो

तुझ्या जगामधे सखे फुले वसंत सारखा
मला सदैव रुक्ष एकटेपणा सतावतो

उगाच वाटते तुम्हांस मी नशेत गुंगतो
सुरे मुळे विरक्त होत श्वास मी कमावतो

सुखासुखी मला मिळे कधी न सावली कुठे
असेल त्या रणातल्या लढ्यात मी विसावतो

कुणीतरी हवेच ना नमून पूजण्या तुला?
तसे म्हणा व्रताविना कुणास कोण पावतो?


-  निलेश पंडित
१७ मे २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा