अंधार पीत जाणे शिकवेल रात्र सारी
अंधार संपताना उजळेल रात्र सारी
ज्या विस्मृतीत गेल्या त्या आठवून रात्री
थंडीत या गुलाबी रंगेल रात्र सारी
केसांत पांढऱ्या तू बघ माळताच गजरा
आता पुन्हा नव्याने बहरेल रात्र सारी
हसणे फुलून यावे, हितगूजही पुसावे
अश्रूंत मात्र हृदये भिजवेल रात्र सारी
क्षण एक हात हाती घेऊ पुन्हा जरासे
स्वप्नातल्या क्षणांना सजवेल रात्र सारी
वणव्यात पेटलेल्या जगलो कितीक वर्षे
रात्रीत फक्त एका विझवेल रात्र सारी
- निलेश पंडित
१३ जून २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा