(वृत्त: भूपती)
ही कृष्णधवल विषमता जगी का मुरते?
मुरताना कुजते आणि मनी चुरचुरते
… अंगार बरसत्या नजरा करती पृच्छा
"का सौख्य तुम्हाला… आम्हा बाधा उरते?"
जे कानी पडती तऱ्हेतऱ्हेचे बोल
वचने ती अंती ठरती मातीमोल
… खेळणी असावे धूर्तां हाती कोणी
हे नशीब त्यांचे? … बाकी सारे फोल?
पण युगायुगांचा जोर दयाळू फार
तो लुळ्या करांना शिकवी करणे वार
… सुरवंटासम लढण्या देई तो शक्ती
देण्यास पिढीला नव्या नवा आकार
त्या उत्क्रांतीचा भाग होउया आता
या … लिहू तमावर प्रकाशदायी गाथा
… नजरेतिल अंगारांचे बनवू तेज
अवघ्या जगताचा उन्नत राहो माथा
- निलेश पंडित
२८ जून २०१३
ही कृष्णधवल विषमता जगी का मुरते?
मुरताना कुजते आणि मनी चुरचुरते
… अंगार बरसत्या नजरा करती पृच्छा
"का सौख्य तुम्हाला… आम्हा बाधा उरते?"
जे कानी पडती तऱ्हेतऱ्हेचे बोल
वचने ती अंती ठरती मातीमोल
… खेळणी असावे धूर्तां हाती कोणी
हे नशीब त्यांचे? … बाकी सारे फोल?
पण युगायुगांचा जोर दयाळू फार
तो लुळ्या करांना शिकवी करणे वार
… सुरवंटासम लढण्या देई तो शक्ती
देण्यास पिढीला नव्या नवा आकार
त्या उत्क्रांतीचा भाग होउया आता
या … लिहू तमावर प्रकाशदायी गाथा
… नजरेतिल अंगारांचे बनवू तेज
अवघ्या जगताचा उन्नत राहो माथा
- निलेश पंडित
२८ जून २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा