हा ब्लॉग शोधा

बुधवार, १० जुलै, २०१३

बहाल


उरला रस्ता अवघड, खडतर, बकाल होता
परंतु हाती तुझा सुगंधी रुमाल होता

मनात ठेवुन विचारला नाहीस कधी जो
तोच नेमका मनात माझ्या सवाल होता

इतिहासाला माझा किस्सा नवीन नाही
एक एक तेव्हाही झाला हलाल होता

तुझी छबी स्वप्नातही असे गोड गुलाबी
विरह तेवढा खरा आणखी जहाल होता

चित्रांकित होत्या माझ्या झोपडीत भिंती
हरेक चित्रामध्ये तुझा अन महाल होता

तुझ्याच साऱ्या आठवणींचे भविष्य आता
भूतकाळ ही तुलाच केला बहाल होता


- निलेश पंडित
१० जुलै २०१३

२ टिप्पण्या:

  1. अशी मुसलसल गझल सुहानी अहा मिळाली !
    शेर शेर एक एक इथला कमाल होता

    उत्तर द्याहटवा