मोरपिशी लेखणीचे
गूढ खोल अंतरंग
शब्दांतून पाझरती
आयुष्याचे सप्तरंग
रक्तवर्खी जीवघेणा
मांडे वेदना अफाट
काळाशार भीतीयुक्त
मापतो मृत्यूची वाट
कधी शृंगार गुलाबी
सुरकुतीतून हासे
उदात्ताचे अलिप्ताचे
तेज भगव्यात भासे
आकाशाच्या निळाईशी
जुळे मनाची शांतता
आणि हिरव्यात वसे
माझ्या मायेची आर्द्रता
एक रंग काही केल्या
मला कळेना कळेना
अज्ञाताची अथांगता
कधी संपेना संपेना
मोरपिशी लेखणीचे
माझ्या आगळे स्वरूप
दैनंदिन जगण्याला
सप्तरंगी उदधूप
- निलेश पंडित
६ जुलै २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा