हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १९ जुलै, २०१३

परिस

(वृत्त: शुभगंगा)



असेच असते जीवन श्वासाश्वासांचे
तळघरातल्या - नभातल्या आभासांचे

अवघड नवथर थरथर थोडी अज्ञांची
भरीस त्यातच मिसळ क्लिष्टशा संज्ञांची

कधी त्यास फटकारा ध्यास नि त्रासाचा
मंत्रजागरी शिमगा फाल्गुनमासाचा

त्यात उजळते ज्वालांनी काही सोने
जन्मा येते जे परिसाच्या स्पर्शाने

असो बाह्य वा परिस असो अंतरातला
संपर्काचा असे योग प्राक्तनातला

हर धातूला वाटे सोने व्हावेसे
ध्यासाच्या पोटात वासनेचे फासे

त्यात मोकळे होती अडती श्वास कधी
तळघर आणिक नभातले आभास कधी

प्रवासात या हृदय सारखे धडधडते
अडखळणाऱ्या गतीतून जीवन घडते


- निलेश पंडित
२० जुलै २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा