हा ब्लॉग शोधा

बुधवार, ३१ जुलै, २०१३

भान

(वृत्त: कालगंगा)

स्वप्नवेड्या या मनाला वास्तवाचे भान का?
तोल माझा राखता मी तू अशी बेभान का?

चिंब ओली रात्र वेडी येउनी गेली खरी
जागण्याचे पण तिच्या नंतर असे आव्हान का?

नाटकी हसणे तुझे, पाहून ओळख टाळणे
यांत उसने भासते मजला तुझे अवसान का?

आज मी ना तो तशी तू ही जुनी नाहीस ती
या नव्या गाथेत तेंव्हाच्या स्मृतींचे पान का?

नाइलाजाने जगी सन्यस्त मी तर एकटा
होरपळ होता तुझी माझा इथे सन्मान का?

देह मन माझे रिकामे वाटले होते मला
पाहुनी तुज डाचते माझे मला अज्ञान का?


- निलेश पंडित
३० जुलै २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा