हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१३

भारत - पुन्हा एकदा


प्रदूषणाची भव्य धुराडी
धूर सारखा ओकत बसती
वावरणारी त्यांत माणसे
तोच धूर मग झोकत बसती

सत्ता किडली वैगुण्याने
गुणी बहुत …. त्यां सत्ता नाही
कर्तबगारी - मूल्य निर्मिती
विषवृक्षांही पोसत राही

परंतु या नाण्याला बाजू
दुसरी अतीव उज्ज्वल खास
नवकौशल्ये, नवतंत्रांनी
आर्थिक बळ वाढे हमखास

गरीब, श्रीमंतांतिल अंतर  
…. मान्य …. जरासे जाचत आहे
एकत्रित आवक देशाची
वाढत धन पण साचत आहे

परसत्तेच्या कुबड्या पडता
भले देश लंगडतो आहे
जिजीविषा … नीतीधैर्याने
धडपडतो अन् लढतो आहे

स्वातंत्र्याच्या पासष्टीला
भारत पुनश्च वसतो आहे
कधी दुखे अन् कधी तुटेही
परंतु कंबर कसतो आहे


- निलेश पंडित
३ जानेवारी २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा