हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१३

हिवाळा

(वृत्त: मंजुघोषा)

बोचरा झाला जरा गेला हिवाळा
एकटे टाकून मज सरला हिवाळा

फोल म्हणणे भासते थंडी गुलाबी
पाहिला बर्फात थिजलेला हिवाळा

दाह हेमंतात ग्रीष्माचा अकाली
टोचणी लावून गेलेला हिवाळा

वृक्ष, झाडे आणि मी ही … सर्व झडलो
न्यायला जेव्हां तुला आला हिवाळा

दूर नाही भेट आता … दूर नाही
माझियासाठी निपजलेला हिवाळा- निलेश पंडित
३१ ऑगस्ट २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा