(वृत्त: मंजुघोषा)
सत्य, शांती अन् क्षमा पाळीव येथे
ज्यांस जपती हिंस्त्र सारे जीव येथे
लगबगीने मंदिरी व्यापार चाले
आणि मूर्ती देखण्या निर्जीव येथे
लोकशाही खेळ झाला शोषकांचा
शोषितांना मात्र ना जाणीव येथे
भंजकांचे राज्य असताना सभोती
कोण शिल्पे कोरते रेखीव येथे?
'पंडिता'चा तर्क झाला क्षीण आता
मीच माझी आज करतो कीव येथे
- निलेश पंडित
२५ ऑक्टोबर २०१३
सत्य, शांती अन् क्षमा पाळीव येथे
ज्यांस जपती हिंस्त्र सारे जीव येथे
लगबगीने मंदिरी व्यापार चाले
आणि मूर्ती देखण्या निर्जीव येथे
लोकशाही खेळ झाला शोषकांचा
शोषितांना मात्र ना जाणीव येथे
भंजकांचे राज्य असताना सभोती
कोण शिल्पे कोरते रेखीव येथे?
'पंडिता'चा तर्क झाला क्षीण आता
मीच माझी आज करतो कीव येथे
- निलेश पंडित
२५ ऑक्टोबर २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा