हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

निष्प्राण

(वृत्त: आनंदकंद)

निष्प्राण शुष्क काया भरगच्च पुष्पमाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

म्हणतील लोक "जगला", म्हणतील लोक "जळला"
जळलो कितीक वर्षे, कळले कुणाकुणाला?

मी पाहिली खरी पण स्वप्ने खरी न झाली
आधार मात्र त्यांचा होता बरा मनाला

मी सोबती जगाला मानीत नित्य गेलो
मृत्यू खरा सखा पण होता उभा उशाला

झोकात चालताना पडलो अनेकदा मी
आधार देत गेला प्याला क्षणाक्षणाला

काही विशेष नाही जग 'पंडिता' न कळले
त्याला जसे न कळले, तो ना कळे जगाला


- निलेश पंडित
२५ ऑक्टोबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा