हा ब्लॉग शोधा

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१३

शोषण

(वृत्त: व्योमगंगा)

शोषकांनी शोषणाला देउनीही मूठमाती
मुक्तकंठाने इथे का शोषितांच्या जाहिराती?

धन, प्रसिद्धी, उच्च शिक्षण आणि सत्ताही मिळाली
पण यशस्वी या पिढ्या का गीत गर्तेचेच गाती?

आपली भाजून पोळी तापलेल्या या तव्यांवर
धूर्त राजे आजही येथे मिळवती स्वर्ग साती

दैन्यवाणे आजही पिचतात येथे कैक सारे
मात्र थोड्या वेगळ्या त्यांच्या व्यथा … त्यांच्या जमाती

'पंडिता' आता मशाली पेटवाव्या सुज्ञतेच्या
आणि घडवावी नव्याने स्वच्छ, निर्मळ, शुद्ध नाती


- निलेश पंडित
२८ ऑक्टोबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा