हा ब्लॉग शोधा

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१३

चलबिचल

(वृत्त - कालगंगा)

चलबिचल होते मनाची केवडा माळू नको
चलबिचल पण टाळण्याला भेटणे टाळू नको

जाणतो भलता कुणी जपतो तुला आता 'उरी'
भेटता मी पदर जप पण नजर सांभाळू नको

जर सुखी आहेस झाली तू खरी अपुल्या घरी
हास वा ना हास तर, पण आसवे गाळू नको

आपले जे प्रेम होते ते जसे होते तसे
… आठवू … विसरून जाऊ मात्र पडताळू नको

जाळ आता सर्व पत्रे नष्ट कर सारे दुवे
खोल लपलेल्या स्मृतींचा भार पण जाळू नको


- निलेश पंडित
२४ नोव्हेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा