हा ब्लॉग शोधा

बुधवार, ११ डिसेंबर, २०१३

वानवा

'वाहवा'चा वर्षाव
तशीच अनपेक्षित वानवा
विसरून
कल्पना-सत्या मधली …
कागदा-मना मधली
तफावत
दूर करून
एक एक पापुद्रा
नकळत चढलेल्या मुखवट्यांचा
उतरवून
अक्षरा-शब्दांच्या
काळ्यापांढऱ्या रेघोट्यां पलीकडे
मनाच्या निःशब्द तळाशी
पोहोंचून …
….
वाटतंय
आता बघावं काही काळ
स्वतःचीच कविता
खरंच मनापासून जगून
आतल्या आत
अदृश्य निकट खऱ्या श्रोत्याची
प्रांजळ दाद
मिळवण्यासाठी


- निलेश पंडित
१२ डिसेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा