हा ब्लॉग शोधा

शनिवार, १४ डिसेंबर, २०१३

वैचित्र्य

(वृत्त: शुभगंगा)

उदाहरण साधे घ्या काही लिंबांचे
वैचित्र्याच्या नैसर्गिक प्रतिबिंबांचे

हजारांत नउशेनव्वद साधी असती
बिया ज्यांत साताठ कापता आढळती

विरळा परंतु असती विचित्रही काही
ज्यांस जन्मतः गर नाही वा बी नाही

तेच दैव माणसास लाभे अनेकदा
लाखो साधारण अन् विचित्र एखादा

चार, पाच अन् सहा फुटांची नित्य जिथे
बुटका दिसतो दोन फुटांचा कुणी तिथे

सुजाणांत शेकडो कुणी मतिमंद असे
जरा आठवा जपतो आपण त्यास कसे

जर ह्या अपवादांना सामावुन घ्यावे
लैंगिक वैचित्र्यास त्याज्य का मानावे?


- निलेश पंडित
१४ डिसेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा