हा ब्लॉग शोधा

रविवार, १९ जानेवारी, २०१४

झरा

(वृत्त: जीवनलहरी)

सुप्त मनी सळसळता
स्वप्नांचे कंगोरे
चुळबुळते मन माझे
टाळण्यास बिंब खरे

धुरकटशा क्षितिजाशी
फक्त धुके साठतसे
थंड बुळबुळीत स्पर्श
पायांना ग्रासतसे

स्वप्ने साचत जाता
भीती येते सरते
जागृतीत अवचित ये
आनंदाचे भरते

अंतरात सर्वतेत
शुद्ध करावे स्वतःस
दैनंदिन हाच जडे
फक्त मना एक ध्यास

स्वप्नात नि सुषुप्तीत
कवळावे दिगंतरा
आणि स्वच्छ गवसावा
खळखळता एक झरा


- निलेश पंडित
१९ जानेवारी २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा