(वृत्त: शार्दूलविक्रीडित)
वृत्ते, आकृतिबंध, छंद - असले आम्हा नसे माहिती
काव्याच्या स्वरुपात मूल्य कसले? आम्हा न त्याची क्षिती
तत्वाने नसते सुसाध्य सगळे तत्वाविना चाहतो
सारे साधक मूढ फक्त म्हणतो, कौशल्य दुर्लक्षितो
बंधावीण अनेक शब्द रचणे आम्ही तसे जाणतो
तंबोरा तबल्या शिवाय म्हणणे गाणे जसे मानतो
निष्पत्ती-रस शब्द वर्ज्य असले आम्हा सदा सर्वदा
वाक्ये तोडत काव्य घाउकपणे पाडू सुखे कैकदा
आम्हा थोर अजाण वाचक भले ज्यांची नसे वानवा
त्यांना चार सुरेख शब्द दिसता आम्हा मिळे 'वाहवा'
शास्त्राला कसले महत्व असते - बांधून ठेवी उगा
आम्ही बेफिकिरीत 'मुक्त' जगतो धुत्कारतो या जगा
पुत्रांची हि विचारपूस करता? सारी गुणी लेकरे
कष्टांपासुन मात्र दूर पळती - हे चिन्ह नाही बरे!!
- निलेश पंडित
२१ जानेवारी २०१४

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा