हा ब्लॉग शोधा

शनिवार, १५ मार्च, २०१४

सखी


(वृत्त: कलिंदनंदिनी)

अशीच ये नि येत जा अखंड रात्र जागवू
तुझ्याविना सखे कसा - कुठे मनास गुंतवू?

क्षणोक्षणी तुझ्या सवे क्षणैक काळ थांबतो
तुझीच साथ एक ज्यात नित्य मोक्ष लाभतो

शरीर मागते तशी मनासही हवीस तू
भले असो शिशिर तरी वसंत भासतो ऋतू

सदैव जीव लावणे स्वभाव हा तुझा भला
तसेच गोडवा कडूपणात शोभतो तुला

नवल नसे तुझ्यासवेच स्वर्ग सात लाभती
उगाच का अनेक लोक "ओल्ड मंक" मागती?


- निलेश पंडित
१६ मार्च २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा