(वृत्त: पादाकुलक)
आठवती ते, आठवते ती
आठवते अन् विचित्र नीती
परिस्थितीच्या भोवऱ्यातली
झपाटलेली विचित्र नाती
बालपणातिल आगीचे व्रण
करपट काळ्या मलिन त्वचेवर
नाका खाली, गालावरती
त्यातहि जखमा खोल मनावर
अशीच फुलली, अशी वाढली
लेउन काही सुक्या पाकळ्या
तरुणपणीच्या उष्ण भावना
देह आत जाळण्या उमलल्या
जरी न मिळणे घास नशीबी
शरीरतेची भूक दाटली
काय करावे अशा कुडीने
दुर्लक्षुनि का जाते मिटली?
भूक वाढता तप्त होउनी
मिळेल ते ती खाई दाणे
सावज करुनी याच भुकेचे
तुकडे मोडित कुणी शहाणे
कोण फसवतो कुणास आणिक
वापर करतो कोण कुणाचा
घुसमटलेली ही व्यक्तित्वे
प्रश्न पाडिती जनामनांचा!
- निलेश पंडित
६ ऑगस्ट २०११
आठवती ते, आठवते ती
आठवते अन् विचित्र नीती
परिस्थितीच्या भोवऱ्यातली
झपाटलेली विचित्र नाती
बालपणातिल आगीचे व्रण
करपट काळ्या मलिन त्वचेवर
नाका खाली, गालावरती
त्यातहि जखमा खोल मनावर
अशीच फुलली, अशी वाढली
लेउन काही सुक्या पाकळ्या
तरुणपणीच्या उष्ण भावना
देह आत जाळण्या उमलल्या
जरी न मिळणे घास नशीबी
शरीरतेची भूक दाटली
काय करावे अशा कुडीने
दुर्लक्षुनि का जाते मिटली?
भूक वाढता तप्त होउनी
मिळेल ते ती खाई दाणे
सावज करुनी याच भुकेचे
तुकडे मोडित कुणी शहाणे
कोण फसवतो कुणास आणिक
वापर करतो कोण कुणाचा
घुसमटलेली ही व्यक्तित्वे
प्रश्न पाडिती जनामनांचा!
- निलेश पंडित
६ ऑगस्ट २०११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा