हा ब्लॉग शोधा

शनिवार, ५ एप्रिल, २०१४

धुरा


प्रकाशातल्या
आयुष्याच्या
लखलखीतशा
आकर्षक पण
जडावलेल्या
जगातून मी
विचारपूर्वक
परतुन गेलो
पुन्हा एकदा
अंधाराच्या
गूढ जगाला
अनुभवण्यास्तव

पण जेव्हा मी
अंधारातहि
त्रासत गेलो
त्या ओझ्याने
जे मज तेव्हा
माहित नव्हते
पण होते जे
दाहक वास्तव

तेव्हा झालो
जागा आणिक
चाचपले मी
स्वतःलाच
अंधारामध्ये
अगतिकतेने
जाणुन घेण्या
त्रुटी नेमकी
काय राहिली

… आणि समजले
तमातही मी
मनात माझ्या
नकळत जुनीच
केवळ माझी
'मी मी मी' ची
धुरा वाहिली!


- निलेश पंडित
५ एप्रिल २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा