(वृत्त: उद्धव)
शांती-आनंदापोटी
नीती-न्यायाची वस्ती
मूल्याधाराने मूल्ये
तत्वता नेहमी रुजती
विश्वास भाबडा असला
आशेची देतो ग्वाही
विश्वास देत जगणाऱ्यां -
- मागे जाते जनताही
सळसळे शेकडो वर्षे
अश्वत्थ विराट नि गूढ
खोडात नांदती सूज्ञ
पानांतुन गळती मूढ
जाणवती दिसती मूल्ये
चकचकीत पानांवरती
जी पायाभूत तयांना
ती खोडामधली शक्ती
वास्तवास मन घाबरते
मग कानाडोळा करते
लोंबते फक्त देठांना
अन् मजेत वरवर जगते
- निलेश पंडित
१२ एप्रिल २०१४
शांती-आनंदापोटी
नीती-न्यायाची वस्ती
मूल्याधाराने मूल्ये
तत्वता नेहमी रुजती
विश्वास भाबडा असला
आशेची देतो ग्वाही
विश्वास देत जगणाऱ्यां -
- मागे जाते जनताही
सळसळे शेकडो वर्षे
अश्वत्थ विराट नि गूढ
खोडात नांदती सूज्ञ
पानांतुन गळती मूढ
जाणवती दिसती मूल्ये
चकचकीत पानांवरती
जी पायाभूत तयांना
ती खोडामधली शक्ती
वास्तवास मन घाबरते
मग कानाडोळा करते
लोंबते फक्त देठांना
अन् मजेत वरवर जगते
- निलेश पंडित
१२ एप्रिल २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा