हा ब्लॉग शोधा

शनिवार, २६ एप्रिल, २०१४

झिंग


(वृत्त: राधा)

बंद ओठांनी हवे ते सर्व मागावे
आणि त्यावर मस्त माझे स्वप्न रंगावे

एक उतरावी नशा दुसरी चढू द्यावी
मी मिठी आधी तुझ्या ओठांत झिंगावे

मान हलवुन तू जरी म्हटले 'नको ना रे'
लाल गालांनी खरे मज सर्व सांगावे

गोठवावा देह श्वासांनी तुझ्या माझ्या
आणि रात्रीच्या स्मृतींनी चित्त गुंगावे

उष्ण स्पर्शांचे दिलेले दान तू तेव्हा
तू न मागावे परत अन् मी न त्यागावे

देह निजणे आणि विझणे अटळ असताना
रम्य माझ्या आठवांचे विश्व जागावे

- निलेश पंडित
२७ एप्रिल २०१४

३ टिप्पण्या: