हा ब्लॉग शोधा

शनिवार, १७ मे, २०१४

मूक

(सूर ना सजे …. ह्या गीताचा भावानुवाद)

(वृत्त: मंजुघोषा)

शांतता ग्रासे जिवाला रोमरोमी
सूर माझा लोपता गाऊ कसा मी?

जीवनाची नित्य झाली फक्त होळी
रात्र ही ना संपणे माझ्या कपाळी
का प्रकाशावीण ज्वाला जीव जाळी?
…. मूकतेचा घेतला असला वसा मी
(सूर माझा … )

ते तसे हे ही नुरावे विश्व मजला
उमटण्या आधी गळ्यातच सूर अडला
कोप दैवाचा असा का घोर घडला
…. का मला उःशापही नाही विरामी
(सूर माझा … )

सूर देती पंख जगण्याला मनाला
नवरसांचा स्वाद मिळण्या मानवाला
याच देही जाणण्या परमेश्वराला
…. सांग त्यागावे कसे देवा तुला मी?
(सूर माझा … )


- निलेश पंडित
१८ मे २०१४

________________________________________

मूळ गीत

सुर ना सजे क्या गाऊं मैं
सुर के बिना जीवन सुना

जलते गया जीवन मेरा
इस रात का न होगा सवेरा

दोनों जहां मुझ से रूठे
तेरे बिना ये गीत भी झुठे

संगीत मन को पंख लगाये
गीतों से रिमझिम रस बरसाये
स्वर कि साधना परमेश्वर की

- शैलेंद्र
(चित्रपट - बसंत बहार १९५६)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा